Kopargaon Tahsildar Trapped : अहमदनगर : 20 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी एकजण एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. लाच घेण्यासाठी प्रवृत्ती केल्याप्रकरणी तहसीलदारावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून समोर आला आहे.
विजय जबाजी बोरूडे (रा. शासकीय निवासस्थान कोपरगाव, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कोपरगावचे तहसीलदाराचे नाव आहे. (Kopargaon Tahsildar Trapped) तर लाच घेतल्या प्रकरणी गुरमीत सिंग दडियल (40, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याप्रकरणी आरोपी दडियल याने कोपराव येथील तहसीलदार बोरुडे यांच्यासाठी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. (Kopargaon Tahsildar Trapped) दरम्यान ही लाच घेतल्याचे आरोपी दडियल याने मान्य केले. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 17 मे बुधवार रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून 19 मे शुक्रवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
एसीबीने रचनेच्या सापड्यात दडियल अडकला, त्याने वीस हजाराची लाच घेतली त्यावेळी त्यांना रंगेराथ पकडण्यात आले. शिवाय तहसीलदार बोरूडे आणि गुरमीत दडियल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kopargaon Tahsildar Trapped) पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri ACB Trap : दोन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…!