पुणे : बोपदेव घाटात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
सोनुकुमार छोटेलाल सरोज (वय- २३), मिथिलेश कुल्लन सरोज (वय-२० दोघे रा. पुणे रेल्वे स्टेशन जवळ, मुळ रा. बुढेपुर, ता. कुंडा, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), राजा शिवपुजन सरोज (वय- २० रा. लोचनगढ, ता. कुंडा, जि. प्रतापगढ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारी गस्त घालीत असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात तीनजण काळ्या रंगाच्या दुचाकीवरुनतोंडाला रुमाल बांधून टेबल टॉप पॉईंटच्या दिशेने जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी दुचाकी वेगात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी टेबव टॉप पॉइंटच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आरोपींच्या गाडीचा पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्टल आढळून आले. पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त केले. याप्रकरणी तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस अंमलदार निलेश देसाई, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, बनसुडे, ज्ञानेश्वर भोसले, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.