Kolhapur News : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे. एका वृद्ध दाम्पत्याने स्वतःच्या चितेची तयारी करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे.
आजारपणास कंटाळून आत्महत्या
आजारपणास कंटाळून दाम्पत्याने असं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. (Kolhapur News ) कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापुर्वी या वृद्ध दाम्पत्याने चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. (Kolhapur News ) आपल्या आजारपणास कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र आपल्या मृत्यूनंतर कोणाला त्रास नको या हेतून दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी चितेला लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव करुन ठेवली. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून राजकीय वादळ; हिंसाचाराचे पडसादही उमटणार?
Kolhapur News : शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी