Kolhapur News : किणी : पुणे-बंगळूर महामार्गावरून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. भरधाव आर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला चाललेल्या रोडरोलरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान सकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. ही धडक एवढी जोरदार होती की, धडकेने रोडरोलर हा साईड रस्त्यावर जात पलटी झाला, तर गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाला. (Artiga collides with road roller on Pune-Bangalore highway; Two dead, four seriously injured)
राहुल अशोक शिखरे (वय ३० रा.मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय २८ रा.टोप) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सुयोग पाटील (वय २८), सुनील कुरणे (वय २४), वैभव चौगुले (वय २३ सर्व रा.टोप) अनिकेत जाधव (वय २२) निखिल शिखरे (वय २७) व राहुल शिखरे (वय ३० सर्व रा. मिणचे) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Kolhapur News )
किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुर महामार्गावर सकाळी साडेसहा वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिगा कारने किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान समोर जात असलेल्या रोडरोलरला जबर धडक दिली. (Kolhapur News ) त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या सर्व जखमींना तातडीने नाणीज मठाच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टोप, शिये व मिणचे येथील डॉल्बी, लेजर लाईट व डेकोरेशन क्षेत्रात काम करणारे सहाजण मुंबई येथे त्यांच्या कामासंदर्भातील प्रदर्शन बघण्यासाठी मुंबई येथे गेले होते. प्रदर्शन पाहून रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ते मुंबई येथील आर्टिगा गाडी (क्र.एम एच ४८ ए के ६५४५) ने घरी परतण्यासाठी निघाले. (Kolhapur News ) त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. मध्यरात्रीनंतर पुण्याजवळ सर्वजण चहा घेऊन निघाले, पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला आर्टिगाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, धडकेने रोडरोलर हा साईड रस्त्यावर जात पलटी झाला, तर गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाला. धडक होताच महामार्गावरील वाहतूक जागीच ठप्प झाली.
दरम्यान, रोलर चालक दादासो दबडे (वय ४० रा वाठार) यांनाही उपचारासाठी हायवे पेट्रोलिंगच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Kolhapur News )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : दोन सख्ख्या भावांनी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घेतला जगाचा निरोप…!