Hadapasar Crime पुणे : तुला आज संपवूनच टाकणार, (Answered By Murder) तू अनिकेतचा मर्डर (Murder) केला आहे ना, बघ मर्डरला मर्डरनेच रिप्लाय (Reply) देणार असे नुकताच तुरुंगात सुटलेल्या (released youth)तरुणावर आणि त्याच्या मित्रावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon)वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Tried To Kill) केला. हा धक्कादायक प्रकार हडपसरमधील (Hadapsar) सरकारी ३२ नंबर शाळा (School) येथे बुधवारी (Wednesday) पहाटे दीड वाजता घडला.
खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल..!
प्रदीप दिनकर देवकर (वय २२, रा. साडेसतरा नळी, हडपसर ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी ओम ऊर्फ पिंटु भंडारी (वय २३), सागर घायतडक (वय १९), राजन लावंड (वय २२), मेघराज शितोळे (सर्व रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत शिवाजी घायतडक याचा २०२० मध्ये खून झाला होता. त्यात शुभम भोंडे हा आरोपी असून तो गेल्या तीन वर्षापासून तुरुंगात होता. नुकताच तो जामीनावर सुटला आहे. फिर्यादी प्रदीप देवकर हा त्याचा मित्र शुभम भोंडे याच्यासोबत सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी व शुभम यांना रिक्षातून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डरनेच रिप्लाय देणार किंवा मला ५ लाख रुपये दे, आज तुला संपवूनच टाकणार असे म्हणून दोघांवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर वार करुन कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, असे बोलून दहशत निर्माण करुन मोटारसायकलवरुन पळून गेले. तिघेही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करीत आहेत.
Hadapsar Crime : माता न तू वैरिणी.! आईनेच केली ४ वर्षीय मुलीची निर्घुण हत्या; हडपसर येथील घटना..!