(Khopoli Accident) पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ढोल ताशा पथकाची बस कोसळल्याची धक्कादायक घटना रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज शनिवारी (ता.१५) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. (Khopoli Accident)
१७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना खंडाळा घाट उतरताना शिंग्रोबा मंदिराजवळ बस बाजूच्या दरीत कोसळली. या अपघातात १३ ते १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. तर बसमधील १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बोर घाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू पथक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळची टिम, खोपोलीतील अनेक रुग्णवाहिका व नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून दरीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील डॅाक्टरांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. अशी माहिती मिळत आहे.
अपघातात जखमी झालेल्या २४ जणांची नावे पुढीलप्रमाणे :
नम्रता रघुनाथ गावणूक (वय-२९), चंद्रकांत महादेव गुडेकर (वय २९), तुषार चंद्रकांत गावडे (वय-२२), हर्ष अर्जुन फाळके (वय-१९), महेश हिरामण म्हात्रे (वय-२०), लवकुश रंजित कुमार प्रजाती (वय-१६), यश अनंत सकपाळ (वय-१९), वृषभ रवींद्र थोरवे (वय-१४), शुभम सुभाष गुडेकर, रुचिका सुनील धूमणे (वय-१७), ओम मनीष कदम (वय-१८) युसूफ उनेर खान (वय-१४, वरील सर्व रा.गोरेगाव, मुंबई), जयेश तुकाराम नरळकर (वय -२४), हर्ष वीरेंद्र दुरी (वय-२०), विशाल अशोक विश्वकर्मा (वय-२३) दिपक विश्वकर्मा, (वय-२१, चौघेही रा. कांदिवली), कोमल बाळकृष्ण चिले (वय-१५), मोहक दिलीप सालप (वय-१८, दोघेही. रा. मुंबई), ओमकार जितेंद्र पवार (वय-२४, खोपोली, सोमजाई वाडी) सनी ओमप्रकाश राघव (वय – २१ खालची खोपोली) आशिष विजय गुरव (वय-१९, दहिसर), अभिजित दत्तात्रय जोशी (वय-२०, रत्नागिरी), हर्षदा परदेशी व वीर मांडवकर ( यांचे वय आणि पत्ता समजू शकला नाही) असे अपघातात जखमी झालेल्या २४ जणांची नावे आहेत.