Khed News | पुणे : मी अगोदरच दोन मर्डर केले आहेत, तू शांत बस, तुला काही करणार नाही, तू फक्त तुझ्याकडील सामान आमच्याकडे दे, म्हणत एका 24 वर्षीय तरुणाला तीघांनी पुस्तुलचा धाक दाखवून जबर मारहाण करून लुटले आहे. तरुण कंपनीतून काम संपवून घरी जात असताना हा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील खराबवाडी येथील सारा सिटी रस्त्यावर मंगळवारी (दि. 9) मध्यरात्री 1 वाजता घडला.
याप्रकरणी शुभम बळीराम कांगणे (वय 24, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, मूळ गाव कणकरवाडी, ता. रिसोड, जि. वाशिम) याने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हा कंपनीतील काम संपवून खराबवाडी गावातील सारा सिटीकडे जाणार्या रस्त्याने मध्यरात्री घराकडे जात होता. त्यावेळी दुचाकीवरून तीन जण आले व शुभमला तंबाखु मागत शिवीगाळ व दमदाटी केली. नंतर त्याला जवळ असलेल्या पानटपरीच्या मागे ओढत नेले.
तेथे एकाने कंबरेला असलेला पिस्तूल काढून शुभमला दाखवित मी अगोदरच दोन मर्डर केले आहेत, तू शांत बस, तुला काही करणार नाही, तू फक्त तुझ्याकडील सामान आमच्याकडे दे, असे सांगितले. त्यानंतर हातात असलेल्या पिस्तुलने शुभमच्या पाठीत व डोक्यात जबर मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर शुभमकडून मोबाईल, पाकीट, रोख 500 रुपये, एटीएम कार्ड, हेडफोन व कपडे काढून घेतले. तसेच एटीएमचा पासवर्ड धमकावून घेत आरडाओरडा केल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hinjewadi Crime | वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात महिलेने केली बेदम मारहाण; हिंजवडीतील घटना