Khed News : पुणे : केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या दोघांमध्ये वाद होऊन बेदम मारहाण झाल्याचा प्रकार चाकण येथून समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजता घडला आहे. केश कापण्यासाठी लावलेल्या नंबरवरून हा वाद झाला त्यातून दोघांमध्ये मारहाण झाली.
चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
याप्रकरणी श्रीमंत गोरोबा बनसोडे (वय 42, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अंकुर रमेश कारले (वय 42, रा. चांदूस, ता. खेड), प्रदीप भागवत पौळ (वय 20, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा आणि पुतण्या शिराज यादम याच्या कटिंगच्या दुकानात केस कापण्यासाठी गेले होते. तिथे कटिंगच्या नंबरवरून त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.