(Khed Crime ) खेड : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या धुवोली (ता. खेड) (Khed Crime) येथील अजय जठार याच्यावर संपामुळे डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. चांडोली (ता. खेड) येथील (Khed Crime) ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला असून याबाबत आधीच दु:खात असलेले हे नातेवाईक डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल…!
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
धुवोली (ता. खेड) येथील अजय जठार या १७ वर्षीय तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी पुणे जिल्ह्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणला. परंतु संप असल्यामुळे डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. नातेवाईक मृतदेह घेवून रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर होते. परंतु त्यानंतरही डॉक्टरांनी शवविच्छेदन केले नाही. अखेरीस रुग्णालयात खेड पोलीस दाखल झाले.
दरम्यान, पेन्शनच्या मागणीसाठी डॉक्टर संपावर गेले आहे. परंतु डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरु नये, त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी सर्व मार्गांचा जरुर अवलंबन करावा. त्याचवेळी आपल एक डॉक्टर आहोत, तातडीची रुग्णसेवा करणे आपले काम आहे, हे लक्षात घ्यावे, असा सूर सामान्यांकडून व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Baramati Crime : बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराने ९ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अटक..!
Manjari Crime : मांजरी येथील झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू!