Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kharadi News : खराडी पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे; ५ जण ताब्यात, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 18:20

Kharadi News खराडी, ता. ७ : खराडी पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच जुगाराचे साहित्य असा तब्बल ४ लाख ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Kharadi News

खराडी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत काही इसम पैसे लावून ‘१३ पानी’ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. Kharadi News

 

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी महालक्ष्मी लॉन्स परिसरात सापळा रचून अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळणारे पाच जण पोलिसांच्या हाती लागले. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख ८० हजार १४० रुपये, पाच मोबाईल फोन, एक मारुती स्विफ्ट कार, दोन मोपेड दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत करीम खाजामिया मोमीन, प्रशांत श्रिकांत आव्हाळे, अब्दुल जब्बाल लष्कर, दशरथ धानोजी वाघमारे आणि जुगार अड्डा चालवणारा रुबीकेश राजाराम अंधे यांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक गणेश घुले, पोलीस हवालदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे तसेच विलास केदारी, अशोक केदार, सुरज जाधव आणि महेश बोराडे यांनी सहभाग घेतला. Kharadi News

दरम्यान, खराडी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, परिसरात अवैध दारू, जुगार, मटका किंवा मादक पदार्थ विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे सांगितले आहे. भविष्यातही अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार , पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण,तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे, सुरज जाधव, अशोक केदार, विलास केदारी, महेश बोराडे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post

Loni Kalbhor News : हळदी समारंभात नातेवाईकांमध्ये राडा! किरकोळ वादातून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात घातला दगड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.