Karmala News : करमाळा : तालुक्यातील केम ते ढवळस रेल्वे स्थानकादरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लाल रंगाचे कापड दाखवून मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस गाडी थांबवली. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु तो प्रयत्न फसला असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न
या प्रकाराची दखल घेत सोलापूर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. (Karmala News) सीसीटिव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास केम रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.
मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वे गाडी क्रमांक – 22732 ही गाडी केम येथून रात्री साडे नऊच्या सुमारास ढवळसकडे निघाली होती. त्याचवेळी चोरट्यांनी रुळावर लाल रंगाचे कापड लावल्याने चालकाने गाडी थांबवली. (Karmala News) चोरट्यांनी बोगी नंबर 2 बर्थमध्ये शिरकाव केला, महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र रेल्वे डब्यात हिसकावले. काहीतरी भयानक घडत असल्याची महिलांना कल्पना आल्यानंतर त्यांनी जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली.
यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस रेल्वेगाडी जवळ येताच, चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे उज्वल रहांग हाळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, (Karmala News) त्याचबरोबर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी चोरी करण्यासाठी शक्कल लावली होती. परंतु महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे त्याचा जुगाड पुन्हा उजेडात आला आहे. हे प्रकरण गंभीर असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Karmala News : करमाळा : दहावीच्या निकालात शरदचंद्र पवार विद्यालयात मुलींनी मारली बाजी
S.S.Ravi Shankar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील व्यक्तिमत्व : श्री श्री रविशंकर