Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्या खुनातील मुख्य साक्षीदारांचा गेम करण्याचा ‘कट’ लोणी काळभोर पोलिसांनी उधळला ; उरुळी कांचन परिसरातील दोन मुख्य आरोपींसह इतर दोघांना अटक, आणखी आरोपी रडारवर..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 February 2023, 12:37

लोणी काळभोर, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एक वर्षभरापूर्वी झालेल्या बहुचर्चित वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्या खुनातील मुख्य साक्षीदारांना मारण्याचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

आशिष अनिल वरगडे (वय-२२ रा. आश्रमरोड, उरुळीकांचन), उध्दव राजाराम मिसाळ (वय-४५ रा. दत्तवाडी, उरुळीकांचन), सुरज सतिष जगताप रा. गणेशवाडी, वरवंड, ता. दौंड) किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके (रा. बोरीपार्थी, केडगाव, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल सोनाईच्या समोर ऑक्टोंबर २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा खुन भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. त्यानुसार आरोपींवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना (रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या अनुशंघाने लोणी काळभोर पोलीस शनिवारी (ता. २८) गस्त घालीत असताना पोलीस शिपाई निखील पवार यांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार व वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार दत्तवाडी रोड, सरकारी दवाखान्याजवळ उरुळी कांचन याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व तिक्ष्ण हत्यारासह दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींचे अंगझडतीमध्ये त्यांचेकडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस एक धारदार चाकू अशी घातक हत्यारे जप्त करणेत आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली असून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने ४ दिवसांची रिमांड कोठडी दिली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिल हकिकत निष्पन्न झाली आहे. गुन्हयाचे तपासामध्ये यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे.

दरम्यान, सध्या संतोष जगताप याचे खुन खटल्याची सुनावणी सुरु होत आहे. अशावेळी सदर केसमधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे ही गोष्ट आरोपींना ज्ञात असल्याने त्यांनी मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता. त्यांनी कोर्ट पेशीचेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देवुन अटक आरोपींना त्यांचे बाहेर असलेल्या हस्तकांमार्फत अग्निशस्त्र पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांच्या पथकाला मिळाली होती.

कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे यांच्या खुनातील आरोपी सध्या जेलमध्येच…
२०१५ मध्ये कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे यांच्या खुनातील आरोपी संतोष भिमराव शिंदे (रा. शिंदवणे ता. हवेली), निलेश खंडु सोलनकर रा. डाळींब दत्तवाडी, ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनिल महाडीक रा. उरुळी कांचन), विष्णु यशवंत जाधव रा. माळवाडी), नागेश लक्ष्मण झाडकर रा. उरुळी कांचन यांनी केला होता. त्यांना मोका केस मध्ये शिक्षा लागल्याने ते अद्याप जेलमध्ये आहेत.

सदर केस मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळुतस्कर याने आरोपींना शिक्षा होऊ नये म्हणुन प्रयत्न केला या संशयावरुन २२ ऑक्टोंबर २०२१ रोजी संतोष जगताप याचे मर्डर केस मधील आरोपी नामे विष्णु यशवंत जाधव याने कट रचुन संतोष जगताप याचा खुन केला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोर झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप व इतर दोघांचा खुन झाला होता. सदर घटनेमुळे त्यावेळी संपुर्ण पुणे शहर हादरले होते.

सदराची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांचे पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, पोलीस नाईक अमित साळुंके, देवीकर, नागलोत, जाधव, गणेश भापकर, बाजीराव विर, शिरगीरे, कुदळे, फणसे यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

राज्यातील सर्व शाळांमध्ये आता आजी आजोबा दिवस होणार साजरा....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.