Kadamwakwasti sad news लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील उद्योजक नंदू घाडगे यांच्या १७ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Kadamwakwasti sad news)
लोणी काळभोर येथील एमआयटीचा बारावीचा विद्यार्थी
सोहन नंदू घाडगे (वय- १७, रा. भापकर प्लॉटिंग, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहन घाडगे हा लोणी काळभोर येथील एमआयटीच्या शैक्षणिक संकुलात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मात्र सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना सोहनने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सोहनला तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, सोहनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.