Loni kalbhor लोणी काळभोर, ता. 21 : चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात एका आरोपी महिलेला ३ वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, उर्वरित सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.हा निकाल पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दिला. Loni kalbhor

मंगल सचिन अडागळे (रा. लोणी काळभोर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Loni kalbhor तर गुलाब गणपत पवार, प्रकाश गुलाब पवार, अनिल गुलाब पवार, रेखा अनिल पवार, कमलाबाई गुलाब पवार व लिला प्रकाश पवार (सर्व रा. राहू, ता. दौंड) यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी उमाकांत गुलाबराव शेंडगे (वय 38, व्यवसाय – वाहन चालक, रा. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची बहिण मिना सुरेश अडागळे (वय 40) हिने 2011 साली राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. Loni kalbhor
Loni kalbhor पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिना हिचा विवाह सुमारे 18 वर्षांपूर्वी झाला होता. ती पती व दोन मुलांसह लोणी काळभोर येथे राहत होती. दरम्यान, तिच्या दिराचे दुसरे लग्न झाल्यानंतर घरातील वातावरण बिघडले. नवीन जाऊ मंगल हिने मिना हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार अपशब्द वापरत तिचा मानसिक छळ सुरू केला. “तुझे आणि दिराचे संबंध आहेत,” असे आरोप करत तिला बदनाम करण्यात येत होते. इतकेच नव्हे, तर मंगल हिने आपल्या माहेरच्यांनाही या वादात ओढल्याचा आरोप आहे. तिचे नातेवाईक वारंवार घरी येऊन मिना हिला धमकावणे, अपमान करणे व मानसिक त्रास देत होते. सततच्या या छळामुळे मिना हिचे मानसिक संतुलन ढासळत गेले. Loni kalbhor
घटनेच्या दिवशी मिनाने आपल्या भावाला फोन करून, “माझ्यावर संशय घेतला जात आहे, मला खूप त्रास होत आहे, मला आता जगावेसे वाटत नाही,” असे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यादरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने मंगल अडागळे यांना भारतीय दंड संहिता कलम 306 व 34 अंतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली. Loni kalbhor
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, सहाय्यक फौजदार विनोद कांबळे, पोलीस हवालदार ललिता कानवडे, अश्विनी पवार व पोलीस अंमलदार अशोक शिंदे यांची मोलाची मदत मिळाली. Loni kalbhor
चिठ्ठीतून उघड झाला छळाचा थरार
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत मिना हिने आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले होते. “माझ्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे मी हे पाऊल उचलत आहे. मी निर्दोष आहे, पण मला सतत अपमानित केले जात आहे. माझ्या मुलांची काळजी घ्या,” असे भावनिक शब्द त्या चिठ्ठीत नमूद असल्याचे समोर आले. तसेच, आपल्या पतीविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे नमूद करत जाऊ मंगल हिच्या वागणुकीमुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचा उल्लेख तिने केला होता. Loni kalbhor







