Friday, August 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : स्वतःच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 16:41

Junnar News  जुन्नर, ता. ८ : ओतूर (ता. जुन्नर) परिसरात घडलेल्या अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक प्रकरणात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांनी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी राजेश रामदास नवले याला पॉक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत न्यायालयाने सश्रम जन्मठेप व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. Junnar News

ही धक्कादायक घटना १९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित नऊ वर्षीय मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी घरी आली असताना, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी वडिलांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अमानुष प्रकाराची माहिती समजताच पीडितेच्या आईने तत्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. Junnar News

तक्रारीनुसार आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६, ३२३ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळीचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी.एच. कांबळे यांनी या गंभीर गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेत आरोपीला तातडीने अटक केली होती. तपासादरम्यान आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. Junnar News

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस.बी. शेलार यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी राजेश रामदास नवले याला दोषी ठरवत न्यायालयाने पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच मारहाणीप्रकरणी भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक वर्ष सक्त कारावास आणि एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाजगीरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलिस हवालदार मनिषा ताम्हाणे, महिला कर्मचारी पूजा औटी, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आणि हवालदार देविदास खेडकर यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पोक्सो गुन्ह्याखाली होता फरार

Thursday, 20 August 2026, 22:58

चोरीचा आरोप, पैशांची मागणी अन् धमकी! पुण्यात महिलेच्या छळाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 20 August 2026, 21:57

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात डीजेच्या डेसिबलची अग्निपरिक्षा! थेट पोलिस आयुक्तालयात घेतली साऊंड टेस्ट

Thursday, 20 August 2026, 21:19

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54
Next Post

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp