Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 21:03

पुणे: शाळांमधील दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन आता जाहीर होऊ लागले असून पुण्यासह लातूर, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुट्टीचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागांकडून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी दिवाळी सुट्टीबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळी तसेच प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम सत्राचा शेवट ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी असणार आहे. सुट्टीनंतर शाळा १६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होतील. या कालावधीत दिवाळीतील प्रमुख सण, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी २० दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही सुट्टी २४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी शाळा नियमितपणे सुरू होतील.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांना दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसांचे आवश्यकतेनुसार समायोजन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची संख्या ७६ दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वर्षभरात किमान २३० कामकाजाचे दिवस पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, सुट्टीच्या काळात शाळेतील प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सुट्टी असली तरी शाळेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये खंड पडणार नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16

फक्त १२वी पास आहात पण सरकारी नोकरी शोधताय? तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी! SBI ते रेल्वे 6 हजार 500 जागांवर मेगाभरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Monday, 5 October 2026, 19:55

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp