Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : जुन्नरममध्ये बस थेट खड्ड्यात कोसळली, चालकासह प्रवाशाचा मृत्यू, २० जण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 10:04

Junnar News जुन्नर, ता. १८ : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता.17) सायंकाळी भीषण अपघात घडून एसटी बस थेट रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एसटी बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, तब्बल २० प्रवासी जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. Junnar News

या अपघातात बस चालक मोहम्मद एल. वाय. सलीम (वय ४५, रा. अमरावती) आणि प्रवासी प्रशांत साईनाथ होणशेटे (वय २७, रा. बेल्लर, जि. नांदेड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७०, रा. बेल्हे), कमल कोंडीभाऊ वाकचौरे (वय ६७, रा. बेल्हे), अरुण शंकर गुंजाळ (वय ५१, रा. बेल्हे), दिपाली बबन डोंगरे (वय ३३, रा. डोंगरवाडी), शारदा बन्सी मेंगडे (वय ५९, रा. आणे), अश्विनी गणेश बहिरट / बाहिरट (वय ४८, रा. आणे), उल्हास तांबे (वय ७०, रा. ओतूर), अलका नामदेव गायकवाड (वय ५८, रा. संगमनेर), यमुना यादव पावसे (वय ६०, रा. हिवरगाव पावसा, संगमनेर), दिव्या संजय पवार (वय २१, रा. मानवडी, सिन्नर), सिद्धेश नितीन काळे (वय १०, रा. पाथर्डी), आशा नितीन काळे (वय ३५, रा. पाथर्डी), नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८, रा. पाथर्डी), मगन सुखदेव पाटोळे (वय ४८, रा. बुलढाणा), शोभा मगन पाटोळे (वय ३०, रा. बुलढाणा), शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०, रा. देवडे, पंढरपूर), वैशाली शंकर शेजाळ (वय २३, रा. देवडे, पंढरपूर), सुंदर संदिप येलमर (वय ४०), मनिषा शिवराम बोहाडे (वय ४०), प्रतिभा विनोद मंडले (वय २६) हे जखमी झाहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस ही भिवंडी आगाराची असून कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने प्रवास करत होती. सुट्टीचा दिवस असल्याने बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. महामार्गावरील गुंजाळवाडी फाटा परिसरात बस अचानक अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कोंडीभाऊ वाकचौरे, कमल वाकचौरे, शंकर शेजाळ, वैशाली शेजाळ, मगन पाटोळे, शोभा पाटोळे, शारदा मेंगळे, अश्विनी बहिरट, अलका गायकवाड, अरुण गुंजाळ, दिपाली डोंगरे, उल्हास तांबे, यमुना पावसे, दिव्या पवार, सिद्धेश काळे, आशा काळे, नितीन काळे, सुंदर येलमर, मनिषा बोहाडे आणि प्रतिभा मंडले हे जखमी झाले आहेत. Junnar News

 

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थ, युवक आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. काही प्रवासी बसमध्ये अडकून पडल्याने बचावकार्याला मोठी कसरत करावी लागली. Junnar News

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमींना तातडीने आळेफाटा येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काहींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले याचा शोध घेतला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Junnar News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कानिफनाथ घाटात तरुण-तरुणींना लुटणाऱ्या 3 दरोडेखोरांना अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या; फुरसुंगी पोलिसांची कामगिरी..

Wednesday, 17 June 2026, 16:10

राजकारण तापले! ठाकरेंकडे आता केवळ 3 खासदार; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Wednesday, 17 June 2026, 15:53

संजय देशमुख ‘कॅप्टन’, तर आष्टीकर ‘व्हाइस कॅप्टन’; ओमराजेंना ‘त्या’ हत्या प्रकरणातील निकालाचे आश्वासन? सुषमा अंधारेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Wednesday, 17 June 2026, 15:37

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

Wednesday, 17 June 2026, 15:01
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 17 June 2026, 14:29

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42
Next Post

Yavat News : रस्त्यात वाहने टाकून पसार होणाऱ्यांसह मद्यधुंद चालकांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.