(Junnar Crime News) जुन्नर, (पुणे) : जुनी दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी टेस्ट ड्राइव्ह करण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकी चोरून नेल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता.१९) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. मात्र विक्रेत्याकडून दुचाकीचा शोध सुरू आहे.
दुकानात उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्या…!
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर बायस यांचे आळेफाटा येथे जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचे दुकान आहे. बायस यांनी टेस्ट ड्राईव्हसाठी (एम.एच १४ एचएन ७६३३) ही दुचाकी ठेवली होती. जुनी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघेजण दुकानात रविवारी (ता.१९) दुपारच्या सुमारास आले होते. त्या दोन भामट्यांनी दुकानात उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्या.
त्यानंतर भामट्यांनी हिरो डेस्टिनी स्कूटर पसंत केली. आणि भामट्यांनी इंजिन तपासणीसाठी दुकानदार किशोर बायस यांच्याकडे दुचाकी टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी मागितली. तेव्हा किशोर बायस यांनी त्यांना आपण कुठले विचारले असताना जवळचेच असल्याचे सांगितले. त्यावेळी किशोर बायस यांनी तळघरात असलेल्या दुकानातून दुचाकी काढून टेस्ट ड्राईव्हसाठी चावी दिली.
दरम्यान, संबधित दोघे संशयित भामट्यानी दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले मात्र बऱ्याचवेळ झाला परत आलेच नाही. त्यांना याबाबत संशय आल्याने आपली दुचाकी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बायस यांनी आळेफाटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र विक्रेत्याकडून दुचाकीचा शोध सुरू आहे.
या घटनेने आळेफाटा वाहन खरेदी-विक्री व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुचाकी नेणारे हे दोन्ही भामटे सीसीटिव्ही कैद झाले असून लवकर त्यांना पकडण्यात यश येईल अशी चर्चा परिसरात होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष उदयनराजे भोसले