जालना : शाळकरी मुलाचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. काल सकाळी शाळेत जात असताना, 11 वर्षाच्या मुलाचे तीन आरोपींनी अपहरण केले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपींचा पाठलाग करुन आरोपींना पकडलं.
7 तासात तीनही आरोपी जेरबंद ; पोलिसांची कामगिरी
जालना शहरात शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पोलिसांनी 7 तासात तीनही आरोपींना जेरबंद केलं आहे. काल सकाळी माहिती मिळाल्यानंतर दिवसभर पोलिसांकडून शोधा शोध सुरू होती. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन आरोपींचा शोध सुरू केला होता. यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कारसमोर दुचाकी आडवी लाऊन आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे.