जीवन सोनवणे
खंडाळा, (सातारा) : शिरवळ (ता. खंडाळा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रस्तावित ठिकाणी होण्यासाठी शिरवळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
अनुप सुर्यवंशी, अजिंक्य कांबळे, इम्रान काझी, गजानन कुडाळकर, गणेश पानसरे, केदार हाडके, हितेश जाधव यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.
शिरवळ ग्रामपंचायतीला जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रशासकीय आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या आदेशाने २१ डिसेंबर २०२२ ला निघाला आहे. या योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र सदर ठिकाणी आजतागायत एक वीटहि रचली गेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सदर योजना रद्द व बारगळ्ण्याच्या स्थितीमध्ये आली असून यामागे सातारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत.
कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शिरवळ पोलिसांनी सकाळ पासूनच अग्निशामक वाहन, ॲम्बुलन्स, पाणी टँकर सह चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दुपारी ३ वाजता जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत वरील आंदोलकांनी ग्रामपंचायत हाय हाय, सरपंचाचा धीक्कार असो, पाणीपुरवठा योजना नोयोजित जागी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यत कोणतेही प्रकारचे जलजीवन मिशन अंतर्गत असलेले काम सुरु होनार नाही असे सांगितले. जलजीवन योजना हि ग्रामपंचायातीच्या मागील सदस्यांनी मंजूर केली आहे. याबाबत राजकीय श्रेयावादासाठी नवीन ठिकाणी करण्याचा जो घाट घातला आहे. यावर उद्या तत्काळ बैठक लावून मार्ग काढण्यात येईल. भारतीय जनाता पक्षातील कार्यकर्त्याला आंदोलन करायला लागणे हि खूप मोठी गोष्ट असल्याचे देखील यावेळी आमदार गोरेनी स्पष्ट केले.”
दरम्यान, आंदोलनावेळी शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. .