हडपसर : पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरीक संबंध ठेवायला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण केली त्याचा जाब विचारण्यास आलेल्या विवाहितेच्या आईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हा प्रकार ७ मे २०१७ ते १० नोव्हेबर २०२२ दरम्यान हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात घडला आहे.याप्रकरणी ३३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, दीर व सासुवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला व तिच्या पतीचे मागील काही दिवसापासून भांडणे सुरू होती. फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर सासरकडील लोकांनी संगनमत करुन फिर्यादी यांना घरातील काम व्यवस्थित येत नाही म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरीक संबंध ठेवायला सांगितले. त्याला नकार दिला. त्यामुळे विवाहितेला मारहाण केली.