लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे एका आयफोनसाठी दोघांनी मिळून डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डिलिव्हरी बॉय हरवल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर एकजण फरार आहे.
गजानंद आणि आकाश अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी पोलीसांनी आरोपींसोबत चौकशी केली असता.आरोपींनी सांगितले की, त्यांनी ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरुन दोन मोबाईल फोन मागवले होते. मोबाईल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने त्यांना मोबाईल देण्यास नकार दिला. यानंतर त्या दोघांनी त्या डिलिव्हरी बॉयची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे माटी परिसरातील इंदिरा कालव्यात फेकून दिले.
आरोपींच्या सांगण्यावरुन पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अजुनही मृतदेह हाती लागला नाही. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.