पुणे- पुर्व हवेलीमधील हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यांच्या डेपोमधील कथीत इंधन चोरी व “EXtra” बादलीच्या माध्यमातुन होणाऱ्या शेकडो कोटींच्या अर्थकारणाची चर्चा थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचली असुन, पुर्व हवेलीमधील इंधन चोरीचा तपास थेट सिबीआयच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची चर्चा वरीष्ठ पातळीवर सुरु झाली आहे.
पुर्व हवेलीमधील हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यांच्या डेपोत इंधन टँकरमध्ये भरण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा असतानाही, मागिल कांही वर्षापासुन तेल कंपण्याचे कांही वरीष्ठ अधिकारी व वाहतुकदार यांच्या अभद्र युतीमुळे “EXtra” “बादली” च्या साह्याने कांही ठरावीक टॅंकरमध्ये अतीरिक्त इंधन टाकुन तेल कंपण्यांना शेकडो कोटीचा गंडा घातल्याचा संशय पंतप्रधान कार्यालयाला आला आहे. यातुन पुर्व हवेलीमधील इंधन चोरीचा तपास थेट सिबीआयच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची चर्चा वरीष्ठ पातळीवर सुरु झाली आहे.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपण्याच्या डेपोतुन इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, दोन महिण्यापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाईंतर “पुणे प्राईम न्यूज” ने “EXtra” बादलीच्या या अर्थकारणामुळे तेल कंपण्याचे कांही वरीष्ठ अधिकारी व वाहतुकदार तेल कंपण्यांना शेकडो कोटींचा गंडा घालत असल्याबाबतच्या बातम्या वेळोवेळी प्रसिध्द केल्या होत्या. भारत पेट्रोलियम कंपणीच्या मुंबई कार्यालयामधील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी “EXtra” बादलीच्या या अर्थकारणामुळे कंपण्यांना तोटा सोसावा लागत असल्याचे वृत्त फेटाळले होते. मात्र इंधन चोरीचा तपास थेट सिबीआय करणार असल्याने “पुणे प्राईम न्यूज”चे वृत्त खरे ठरले आहे.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपण्याच्या डेपोतुन इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, दोन महिण्यापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाईची चौकशी अद्यापही चालु असुन, पोलिसांनी मागिल महिनाभऱात भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधील तब्बल एकविस टॅंकर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय पोलिसांना असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, या प्रकरणाचे तपास अधिकारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणीक यांची बदली झाल्याने, हा तपास थंडावेल असे वाटत होते. मात्र, इंधन चोरीचा तपास थेट सिबीआयच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची चर्चा वरीष्ठ पातळीवर सुरु झाल्याने, इंधन चोरीत सहभागी असणारे अधिकारी व वाहतुकदार यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यात इंधन टँकरमध्ये भरण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा आहे. मात्र, तरीदेखील इंधन माफिया कंपणीच्या काही ठराविक लोकांना हातीशी धरून 15 लिटरच्या बादलीने सहा ते सात बादल्या अतिरिक्त टाकुन असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. केवळ मागिल दिड वर्षाच्या काळात एका तेल कंपणीच्या तेल साठ्यात तब्बल ८० लाख लिटरची तफावत आली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
इंधन वहातुक करणारे बडे वहातुकदार रडारवर..
पुर्व हवेलीमधील विविध तेल कंपण्याचे कांही वरीष्ठ अधिकारी व वाहतुकदार यांच्या अभद्र युतीमुळे “EXtra” “बादली” माध्यमातुन मागिल दहा वर्षाच्या काळात तेल कंपण्यांना इँधन माफियांनी कित्येक कोटी रुपयांचा चुना लावल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिस तपास योग्य रितीने चालु असतांनाच, राजेश पुराणीक यांना हटवल्याने, तपास थांबतो की काय असे वाटत होते. मात्र हा तपास थेट सिबीआय करणार असल्याने, तीन डेपोमधील इंधन वहातुक करणार बडे वाहतुकदार रडारवर व त्यांना कायमच पाठीशी घालणारे अधिकारी सिबीआयच्या रडारवर असणार आहेत. अनेक बडे वाहतुकदार नेमके बडे कसे झाले. हेही या तपासातुन जनतेला कळणार आहे.