दीपक खिलारे
Indapur News इंदापूर : तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे गेल्या सहा महिन्यांपासून भरकटलेल्या वानरास वनविभाग इंदापूर व रेस्कू टीमच्या चार तासांच्या अथक प्रयत्नाने सोमवारी (दि.1) पिंजऱ्यात कैद करण्यात आले.
गावात भीतीचे वातावरण…!
सदर वानर तरंगवाडी गावात गेली पाच महिन्यांपासून वास्तव्यास होते. मध्यंतरीच्या काळात या वानराने गावात हैदोस घातला होता. काही जणांवर त्याने हल्लाही चढविला होता. अनेकांच्या घरात घुसून त्याने घरातील वस्तूंची नासधूस केली होती. त्याच्या या मर्कटलिलाने नागरिक हैराण झाले होते. यामुळे गावात त्याच्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या या वर्तृणीकीबद्दल गावातील सतर्क नागरिकांनी वनविभागास कळविले होते.
या प्रकाराची दखल घेत वनविभागाकडून या वानरास पकडण्यासाठी दोन वेळा सापळा लावण्यात आला होता.परंतु त्यांचा प्रयत्न फेल ठरला होता.
सोमवारी तरंगवाडी गावच्या सरपंच दीपाली वाघमोडे यांच्या घरात हे वानर शिरले असता त्यांनी वनविभागास कळविले. तात्काळ वनविभागाकडून रेस्कू टीमला पाचारण केले गेले व चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर वानरास पिंजऱ्यात कैद करुन उपचारासाठी त्याला पुणे पाठविण्यात आले.
सदरची कार्यवाही इंदापूर चे वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.ए. शेटे, प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.गायकवाड, बाळासाहेब वाघमोडे तसेच बारामती व दौंड येथील रेस्कू मधील नचिकेत यांचे सहकारी यांच्या मदतीने करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : महाराष्ट्र राज्याला गौरवशाली परंपरा : हर्षवर्धन पाटील
Indapur | स्वाभिमानी शेतकरी पॅनलची सत्ता आल्यास जनावरांचा बाजार सुरू करणार : अशोक घोगरे
Indapur | इंदापूर येथे महिला भगिनींसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन