Indapur News : इंदापूर, (पुणे) : सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग करणारा मजकुर प्रसारीत केल्याप्रकरणी वरकुटे खुर्द येथील दोघांना इंदापूर पोलिसांना अटक केली आहे. (Indapur News)
दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
अक्षय शिवाजी शिंदे व बबलु पठाण (दोघे रा. वरकुटे खुर्द ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी समाधान केसकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दोघांनाही गुरुवारी (ता. १५) उशिरा अटक केली आहे. दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Indapur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे या इंन्स्टाग्राम अकाऊंन्टवरुन इस्लाम धर्माबद्दल द्वेषभावना निर्माण होईल अशी रिल प्रसारीत केली. असा अक्षय शिंदे याच्यावर आरोप आहे. (Indapur News)
तर पै. बबलु पठाण या अकाउंटवरुन कत्तलीसाठी विकल्या जात असलेल्या जनावरांबद्दल मजकूर प्रसारीत करण्यात आल्याचा आरोप पठाण यांचेवर ठेवण्यात आला आहे. तपास इंदापूर पोलीस करीत आहेत. (Indapur News)