Indapur News : इंदापूर : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे १२० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या बेलवाडी येथील चारही मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (ता.४) सायंकाळी भेट घेऊन सांत्वन केले. व मृत कामगारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य;
म्हसोबावाडी ता. इंदापूर_ येथे घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सिलाल चव्हाण, मनोज मारूती चव्हाण, जावेद अकबर मुलाणी यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आंम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना आगामी काळातही सहकार्य केले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. (Indapur News)
या घटनेची मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती दिली, त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. राज्य शासन मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. (Indapur News)