इंदापूर, (पुणे) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून घेऊन गेलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या इंदापूर पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आवळल्या आहेत.
सागर अरून राउत (वय – २० रा. टेंभुर्णी, कोश्टी गल्ली ता. इंदापुर) , दादा बळी शेंडगे वय – २१, रा. साठेनगर ता. इंदापुर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ०४) इंदापूर तालुक्यातील माळवाडी परिसरात राहणारे अशोक अंकुश व्यवहारे (वय ४३, रा. क्षीरसागर वस्ती) यांच्या घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना योग्य त्या सूचना देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. सदर घटनेचा पोलीस शोध घेत असताना मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने दोन संशयीत आरोपी सागर राउत व दादा शेंडगे यांना तांब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश पवार करित आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेष इंगळे यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाष पवार, पोलीस हवालदार प्रकाष माने, पोलीस हवालदार ज्ञानेष्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान पोलीस नाईक लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोंखंडे ,लक्ष्मण सुर्यवंषी व खंडागळे यांच्या पथकाने केली आहे.