(Indapur Crime) इंदापूर, (पुणे) : बडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा.. असे म्हणत मित्राचा वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येते. थेट रस्त्याच्या मध्येच टोळक्या्ंता घोळका थांबून केक कापला जातो. तसेच केक कापण्यासाठी शस्त्रांचा वापर केला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. असाच एक प्रकार इदापूरात घडला असून वाढदिवसाचा केक तलवारीने कापने चांगलेच महागात पडले आहे.
वाढदिवसाचा केक कापून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल…!
वाढदिवसाचा केक कापून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली इंदापूर पोलिसांनी एका बर्थडे बॉयला बेड्या ठोकल्या आहेत. इंदापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
सचिन दिलीप सातव (रा. बिजवडी ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २१) आरोपी सचिन सातव याने वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा फोटो सोशल मिडीयावरव्हायरल केला. ही माहिती एका खबऱ्याकडून पोलिसांना दिली.
त्यानुसार, प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलीस नाईक सलमान खान पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉस्टेबल विनोद लोखंडे यांना कायदेशीर कारवाईचे करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सचिन सातव राहते घरी जावून त्याच्याकडे तलवारी बाबत विचारणा केली असता त्याने घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली लोंखडी तलवार मिळून आली. याप्रकरणी पोलीसांनी पंचनामा करून तलवार ताब्यात घेतली व सचिन सातव यास पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, तलवारीने केक कापने गुन्हा असल्याचे माहिती असूनही अनेक तरुण हे कृत्य करीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.