दीपक खिलारे
इंदापूर (पुणे) : १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून बाभुळगाव (ता. इंदापूर) महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या बाथरूममध्ये नेऊन अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अण्णा उर्फ बाबू कडाप्पा जाधव (वय ५५, रा. बाभुळगाव, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभुळगाव (ता. इंदापूर) येथे आरोपीने १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या बाथरूममध्ये नेऊन अश्लील चाळे केले.
ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास फौजदार अपर्णा जाधव करीत आहेत.