शिरूर : पत्ता विचारण्याच्या नावाखाली महिलेच्या गळ्यातील तब्बल ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरालगत असणाऱ्या बोऱ्हाडेमळ्या जवळ असणाऱ्या एस एस हॅाटेल जवळ आज शुक्रवारी (ता.४) सकाळच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी शालन रावसाहेब बोऱ्हाडे ( वय ४८ ) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलां आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शालन बोऱ्हाडे या त्यांच्या नातीला सोडविण्यासाठी शिरूर गावच्या हद्दीतील बोऱ्हाडेमळ्या जवळ असणाऱ्या एस एस हॅाटेल जवळ आल्या होत्या. नातीला रिक्षामध्ये – बसवून घरी जात होत्या. या काळात काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवर ( नंबर माहीत नाही ) तीन अनोळखी इसम (वय-अंदाजे २५ ते ३० वयोगटातील आले होते. त्यांच्या अंगात काळ रंगाचे जकींग व तोंडाला पुर्ण मास्क लावले होते.
दरम्यान, सदर आरोपी इसम यापैकी पाठीमागील इसमाने शिंदे कोठे राहता, असे विचारले. त्यास फिर्यादी यांनी मला माहीत नाही असे सांगीतले. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील हाफ गठण व पानपोत अंदाजे रक्काम ८५ हजार रूपये जबरदस्तीने ओढुन तोडुन घेउन गेले. काही काळातच हा प्रसंग झाला असून आरडा ओरडा केल्यावर चोरट्यांनी त्यांच्या जवळच्या मोटार सायकल वरून पोबारा केला.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक एकनाथ पाटील करत आहेत.