पुणे : कोरेगाव पार्क येथील उच्चभ्रू सोसायटीत ”फेमिना स्पा” सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या खुलेआम वेश्याव्यवसायाचा पर्दापाश करण्यास सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले आहे. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ३ महिलांची सुटका केली आहे. तर दोघांना अटक केली आहे.

नजमूल सुतवली हुसेन (वय-१९) आणि रिपुल आलम (वय-१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत ”फेमिना स्पा” या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
यावेळी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्या महिलांची सुटका केली आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच जागा मालक आणि स्पा चालक एकच आहे का? याचीही पोलीस शोध घेतला जात आहे.







