Shikrapur Crime : शिक्रापूर : महिला तलाठ्यास माजी उपसरपंचाकडून जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शिक्रापूर येथील तलाठी कार्यालयातून समोर आला आहे. यावेळी माजी उपसरपंचाने तलाठी कार्यालयातील कागदपत्रे अस्ताव्यस्त करत सरकारी कामात सुद्धा अडथळा आणला आहे. माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही? यावरून महिला तलाठ्यासोबत वाद घातल त्यांनी शिवागाळ व दमदाटी केली आहे. (In Shikrapur, former deputy sarpanch abused women Talathi; A case of atrocity and obstructing government work has been registered against the former deputy sarpanch in Shikrapur police station.)
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी तलाठी सुशीला गायकवाड यांनी सोमवारी (22) शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Shikrapur Crime) त्यावरून माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे तलाठी गायकवाड या सोमवारी आपल्या कार्यलयात काम करत होत्या दरम्यान माजी उपसरपंच थोरात हे तलाठी कार्यालयात आले. (Shikrapur Crime) त्यावेळी त्यांनी माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही? अशी विचारणा गायकवाड यांना केली. त्यानंतर त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करून, यांची बदलीच करतो, असे म्हणून ते निघून गेले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur | शिक्रापूर येथील मोक्का प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन..
Shikrapur Crime : शिक्रापुर परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ..