योगेश शेंडगे
शिक्रापूर : पंचतारांकित एमआयडीसी असा नावलौकिक असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये खंडणीसाठी चौघांचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडून ७५ हजार रुपये खंडणी घेतल्याची घटना (दि.०६/०७/२०२४) रोजी रात्री९:३० ते१२:३० च्या दरम्यान ढोकसांगवी गावच्या हद्दीत पाचंगेवस्ती येथे घडली आहे.
संतोष मनमोहन बेहरा (वय19वर्षे), (सध्या रा. ढोकसांगवी, ता.शिरुर ,मुळ रा.समरपुर,ता. अहलापुर,जि.जसपुर,उडीसा) यांच्या फिर्यादीवरून, योगेश बारवकर (रा.शिरुर,ता.शिरूर), विनोद राजेंद्र चाबुकस्वार (रा.शिरुर,सुरजनगर,ता.शिरुर) व त्यांचे अनोळखी इतर पाच साथीदार यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद राजेंद्र चाबुकस्वार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा, संतोष सुरेंद्र परिडा असे चौघांना इसम नामे योगेश बारवकर रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे याने त्याच्या अनोळखी पाच साथीदारांसह आपल्या स्कुटी, प्लॅटिना व पल्सर मोटार सायकलवरुन येवुन जबरदस्तीने मारहाण करून त्यांचेकडील तिन्ही मोटार सायकलवरून अपहरण केल. तसेच त्या चौघांना कारेगावचे हद्दीतील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोहन मार्बल्स दुकानाच्या पाठीमागील चार मजली इमारतीच्या तिस-या मजल्यावरील एका खोलीमध्ये नेवुन, प्लॅस्टिकच्या पाईपाने, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली.
“तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर, प्रत्येकाने २५,०००रुपये द्या” असे सांगीतल्याने फिर्यादी तसेच संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा असे तिघांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवरती फोन पे द्वारे पैसे पाठविले. तिघांची एकुण ७५,००० रुपयांची खंडणी योगेश बारवकर याने त्याच्या सोबतच्या व्यक्तीच्या मोबाईलवरील स्कॅनरवरुन घेतली.
रात्री १२:३० च्या सुमारास संतोष परिडा याचे पैसे घेण्यासाठी फिर्यादीचा भाऊ मानस बेहरा याच्याकडे कारेगाव चौकातील, कारेश्वर मंदिर येथे योगेश बारवकर हा त्याचा साथीदार विनोद राजेंद्र चाबुकस्वार याच्याकडील पांढ-या रंगाच्या टाटा अल्ट्रोज गाडी( क्र.MH 12 VC 4879) मध्ये फिर्यादी व त्याचे दोन मित्रांना घेवुन आला. त्यावेळी त्यांना पोलीसांनी पकडण्याच प्रयत्न केला. तेथून योगेश बारवकर हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला. सदर घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे करत आहेत.