बारामती : बारामतीत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका महिलेला ‘आय लव्ह यू’ चा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आणि या मेसेजचे स्क्रीनशॉट काही जणांकडे आहेत. आता वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आणि आता वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. तर या पोलीस अधिकाऱ्याच्या तावडीतून आम्हाला वाचवा. आम्हाला मदत करा, अशी मागणी निनावी पत्राद्वारे एका ‘वरिष्ठ पत्रकारांकडे करण्यात आली आहे.
बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली होती. आता पुन्हा एकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हे मेसेज पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
निर्माण करणारे ठरत आहेत. पोलिसांना अजून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली तरी पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केलेली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.