पुणे – पत्नीशी अनैतिक संबंध ठेवून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या प्रकरणात आरोपीला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. हे आदेश सत्र न्यायाधीश एस. बी. शिरसाळकर यांनी दिले आहेत.
अजिंक्य शिवाजी घुले (वय २०, रा. टाकळी, ता. केज. जि. बीड) असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्यचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याचा जाब विचारल्याने अजिंक्यने मयताला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो पत्नीला घेऊन पुण्यात आला. येथे येऊन त्याने मयताच्या पत्नीशी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर दोघात वाद झाला. यानंतर त्याने आत्महत्या केली. सदर प्रकार हा जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत घडला. असे आत्महत्या केलेल्या २४ वर्षीय व्यक्तीच्या बहिण अनिता घुले यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानंतर आरोपी अजिंक्य घुले याने अॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अॅड. राकेश सोनार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपी व सदर मयत इसम याची पत्नी यांच्यात कोणताही प्रकारचं अनैतिक संबंध नव्हता व सदर आरोपी हा त्या मयत पत्नीला भेटण्यास कधीच पुणेला आला नाही. पूर्वग्रह दूषित विचाराने फिर्यादी अनिता घुले यांनी आरोपी विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अनैतिक संबंध हे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नाही. हा युक्तीवाद आरोपीच्या वतीने अॅड. राकेश सोनार यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शिरसाळकर साहेब यांनी आरोपी अजिंक्य घुले याला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. या खटल्यात अॅड. राकेश सोनार यांना अॅड. महेश देशमुख अॅड. चेतन शिरोडे अॅड. सुधाकर अंबड यांनी सहकार्य मिळाले.