Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 April 2026, 17:40

Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 25 : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याच्या चर्चांनी आता गंभीर वळण घेतले आहे. विशेष म्हणजे, या धंद्यांना स्थानिक पातळीवर ‘मोटू-पतलू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथित धंदेचालकांचे संरक्षण आणि वसुलीचे जाळे असल्याची चर्चा रंगू लागल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Loni Kalbhor

पोलिसांकडून अधूनमधून कारवाया केल्या जात असल्याचा दावा केला जातो; मात्र वास्तवात दारू, मटका आणि इतर अवैध व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “कारवाई फक्त दिखावा आहे; प्रत्यक्षात धंदे पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत,” असा संतप्त सूर परिसरातून उमटत आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई ही केवळ कागदोपत्रीच आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. Loni Kalbhor

 

एमआयटी कॉर्नर परिसरात अंमली पदार्थ व मद्यविक्री सुरू असल्याचे सांगितले जाते. लोणी स्टेशन भागात मटका आणि हातभट्टी दारू, तर इंदिरानगर व घोरपडेवस्तीमध्ये हातभट्टीचा सुळसुळाट असल्याचा आरोप आहे. कवडी माळवाडी परिसरातही अशीच परिस्थिती असून, टोलनाक्याजवळील काही वाईन शॉपमधून रात्री उशिरापर्यंत दारू विक्री होत असल्याची चर्चा आहे. Loni Kalbhor

याशिवाय गावात मटका, पोलीस ठाण्याच्या मागील भागात हातभट्टी दारू, तर माळी मळा परिसरातील झुडपांमध्ये आणि थेऊर फाटा येथील रेल्वे लाईनजवळ पत्त्यांचे क्लब सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही टपऱ्यांमधून तंबाखू, गुटखा आणि इतर नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. Loni Kalbhor

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर “अवैध धंद्यांना नेमके पाठबळ कोण देत आहे?” हा प्रश्न आता थेट पोलिसांवरच येऊन ठेपला आहे. संबंधित चर्चांबाबत अधिकृत पुष्टी नसली, तरी स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. Loni Kalbhor

“मोटू-पतलू”वर कारवाई कधी?
अवैध धंद्यांमागे ‘मोटू’ आणि ‘पतलू’ या नावांची चर्चा जोरात असताना, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हा प्रश्न आता थेट पोलीस प्रशासनालाच विचारला जात आहे. लोणी काळभोर आणि परिसरातील नागरिकांकडून “केवळ कारवाईचे दिखावे नकोत, ठोस पावले उचला,” अशी मागणी होत आहे. अवैध धंद्यांबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर “मोटू-पतलू”वर कारवाई कधी? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
लोणी काळभोर पोलिसांकडून कारवाया होत असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात धंदे सुरूच आहेत. दारू, मटका, हातभट्टी, गुटखा विक्रीवर नियंत्रण नाही. अवैध धंद्यांवर प्रभावी आळा बसवण्यात अपयश आल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठोस व पारदर्शक कारवाईची गरज अधोरेखित होत आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट सुरूच ; जागरूक ग्राहकाने जाब विचारताच डिलिव्हरी बॉईने ऑनलाईन परत केले पैसे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.