Illegal Abortion | सासवड : बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सचिन रणवरेसह तिघांवर जेजूरी पोलीस ठाण्यात रविवारी (ता.१४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थोपटे आणि एजंट बरकडे अशी आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी जेजूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१२ तासांच्या आत चौकशी करण्याचे निर्देश…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली थोपटे यांनी गर्भलिंग निदान केले असून त्यांच्या पोटात मुलीचा गर्भ आहे. त्या गर्भपात करण्याकरता १४ मे रोजी ८ वाजता नीरा येथील श्रीराम हॉस्पिटल डॉक्टर सचिन रणवरे यांच्याकडे ऍडमिट होणार आहे. अशी तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाच्या पुण्यातील कुटूंब कल्याण कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. कुटूंब कल्याणने ही तक्रार पुढे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मेलवर १२ मे रोजी पाठवली आणि त्याप्रकरणी १२ तासांच्या आत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
श्रीराम हॉस्पिटलमध्ये गर्भपात…
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले हे पथकासह रविवारी (ता.१४ मे) सव्वाआठ वाजता श्रीराम हॉस्पिटलमध्ये धडकले. त्यावेळी डॉ. सचिन रणवरे यांच्याकडे त्यांनी सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तपासणी करण्यासाठी आल्याचे सांगत १४ मुदयांना अनुसरून तपासणी केली. या तपासणीत दीपाली थोपटे या महिलेचे नाव त्यांना दिसून आले नाही.
त्यानंतर थोपटे या महिलेच्या फोनवर संपर्क केला असता तिच्या घरच्यांनी श्रीराम हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याचे सांगितले.
पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sasvad Crime : सासवड येथे कोयत्याने सपासप वार करणार्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी..
Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर
Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक