Mumbai Drug मुंबई, ता. 4 : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 7 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. या प्रकरणी दक्षिण आफ्रिकन नागरिकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Mumbai Drug

जेझिल लुवाडो कॅस्टेलानो आणि आरिफ दाऊद पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Mumbai Drug
सीमा शुल्क विभागाने अमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी रात्री संशयावरून नैरोबीहून मुंबईत आलेल्या कॅस्टेलानोला विमानतळावर अडवण्यात आले. त्याची सखोल झडती घेतली असता 1,426 ग्रॅम कोकेन आणि इतर अमली पदार्थ सापडले. Mumbai Drug
जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही खेप मुंबईतील नळ बाजार परिसरात असलेल्या आरिफ पटेल याच्याकडे पोहोचवण्याचा आरोपीचा उद्देश होता. या माहितीच्या आधारे डीआरआयने सापळा रचत आरिफ पटेल यालाही ताब्यात घेतले.
तपासादरम्यान दोघांचाही या गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या मागे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे असण्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. Mumbai Drug







