पुणे : अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावून हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
निलेश सतीश धुमाळ व स्वप्नील थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बालाजी नांदेडचा (नाव व पत्ता पूर्ण माहिती नाही) असे खून झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण रोडकडून महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस कठडयाजवळ असलेल्या कचऱ्याचे ढिगाऱ्यावर (रोहन बिल्डर यांचे सर्व्हे नं. १८७ जागेमध्ये हिंजवडी) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह १५ जुलै २०२२ ला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. ससून हॉस्पीटल यांनी वैद्यकीय अधिकारी त्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम करून मयताचे कारण हे प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अनेक जखमांमुळे मृत्यू (Death due to multiple Injuries in a case of assault) झाला आहे. असे सांगितले होते. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक रविंद्र सुखदेव मुदळ यांनी सरकारतर्फे हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख यांनी अनोळखी मयत बॉडीची ओळख व आरोपीला पकडण्यासाठी सहा पोलीस निरीक्षक सागर काटे आणि सहा पोलीस निरीक्षक गोमारे व त्यांच्या सहकाऱ्यांची दोन तपास पथके तयार केली होती.
दोन्ही पथके समांतर दिशेने तपास करीत असताना, पथकाला आरोपी निलेश सतीश धुमाळ व मयत हे दारू पिण्यासाठी अशोक कंट्रीबारच्या पाठीमागील बाजूस दारू पित बसले होते. दारू पित असताना मयताकडून निलेश धुमाळ याचा दारूचा ग्लास सांडला. या कारणावरून निलेश धुमाळने काठीने व दारुच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर मारहाण केली. आणि आरोपी निलेश धुमाळ हा त्या ठिकाणाहून निघून गेला. या मारहाणीत अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर मयत हा फिरस्ता असून त्याचे नाव बालाजी नांदेडचा राहणारा एवढीच त्याची ओळख पटली आहे.
दरम्यान, घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी जाताना दिसली होती. त्या आधारे सपोनि काटे, सपोनि गोमारे यांनी व त्यांच्या डी.बी स्टाफने कौशल्यपूर्ण तपास करून त्या गाडीचा क्रमांक एम एच १४ सीडी १५०६ हा शोधून काढला. त्यानंतर तपासात निष्पन्न झाले की, मयत इसमाचे प्रेत हे ड्रायव्हर राजेंद्र थोरात व कंट्रीबार येथे कामाला असणारे पाहिजे आरोपी आखील व धर्मेंद्र यांनी गाडीत कचऱ्यासोबत भरून माण महाळुंगे रोडला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले होते. त्याप्रमाणे आरोपींनी पुरावा नष्ट केलेबाबत गुन्हयामध्ये भादवि कलम २०१, ३४ हे कलम वाढ करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परि. २. आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे, सहा. पोलीस उप-निरिक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, रितेश कोळी, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे आणि सुभाष गुरव यांच्या पथकाने केली आहे.