पुणे : जमिनीच्या वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या ४ आरोपींना हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी ८ तासात अटक केली आहे.
विक्की ऊर्फ विकास मुरली रजपुत (वय-२४ रा. वेणुनगर गणेश मंदीरासमोर, वाकड), पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय-२० रा. भोसे ता. खेड), ज्ञानेश्वर ऊर्फ काळया ऊर्फ शिवून गब्बर राजपुत (वय-२० रा. बुध्द विहार मंदीरासमोर वाडे बोल्हाई, ता. हवेली), राजु अक्षय ठाकुर वय -२० रा. आकुर्डी स्टेशनजवळ सप्तशृंगी कॉलनी नद डेअरीजवळ पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी येशू लूटेरा मारवाडी (वय-२८, रा. ब्लू डार्ट कंपनीचे जवळ, शिव कॉलनी, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारवाडी यांचा पुतण्या विकी रजपुत याने वाकड येथील जागेच्या वादातुन फिर्यादी राहत असलेल्या घरी विकी रजपुत व त्याचे साथीदार यांचेसह येवुन त्यांचे चुलते नागु मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली. तसेच विकी रजपुत याने फिर्यादी यांस जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे कडील गावठी पिस्तुलाने गोळया झाडल्या. व त्या फिर्यादीचे हाताला घासुन जखम झाली होती.
यावेळी फिर्यादी हे स्वतःला वाचवण्यासाठी पळून घरात जाउन लपले. यावेळी विकी राजपुत याचे सोबत असलेल्या राजु ठाकुर, पृथ्वीराज राठौड, शित्रुन रजपूत यांनी फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ व वडीलांवर गिलोरीने दगडे मारली तसेच विकी रजपुत याने जिवे ठार मारण्याचे उददेशाने पुन्हा पत्र्याचे शेड मध्ये गोळी झाडली म्हणून चौघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक तपास करीत असताना तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपीतांचे शोध कामी रवाना करून तपासादरम्यान घटनास्थळावर मिळून आलेले दोन रिकाम्या पुंगळ्या व एक जीवंत काडतुस घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. तसेच नेमलेल्या शोध पथकाने आरोपीतांचा माग काढण्यासाठी घटनास्थळाचे आजुबाजुचे तसेच आरोपी मिळून येणारे संभाव्य ठिकाणचे एकूण १५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीचे आधारे यातील आरोपीतांना कस्तुरे चौक, विठ्ठल लॉन्स चे समोर ट्रंप लावुन चार आरोपी हे दोन दुचाकी गाडीवरून पळुन जात असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून ८ तासाचे आत वरील चौघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पृथ्वीराज राठोड, ज्ञानेश्वर ऊर्फ काळया राजपुत, राजु ठाकुर व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी व्यापाऱ्याला आडवून गावठी पिस्टल ने फायर करून व तलवारीने मारहाण करून त्यांच्या कब्जातील ४० तोळे सोन्याचे दागीने व ३० किलो चांदीचे दागीने घेऊन पळून गेल्या बाबत त्यांच्या विरूध्द दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होते ते पोलीसांना मिळून येत नव्हते. त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस स्टेशन येथे सोने व्यापा-यावर टाकलेल्या दरोडयाच्या गुन्हयातील १ तोळे २ ग्राम चे दागिने जप्त केले आहेत. वर नमूद आरोपी यांनी हिंजवडी, निगडी, पौड पोलीस ठाणेचे हद्दीत चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले असून असे एकूण १६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील चोरीस गेलेला एकूण ८ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हिंजवडी तपास पथकाने हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार स्वामिनाथ जाधव, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे.