पुणे : नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट कस्टमर केअर सुरु करून नागरिकांची फसवणुक करणाऱ्या रॅकेटचा हिंजवडी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने संयुक्तिक कामगिरी करीत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून त्यातील ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत.
अशोक कुमार धुकाराम माली (वय- ३१), जयप्रकाश धुकाराम माली वय २७), पारस कुमार गौराराम माली, (वय २१, रा. तिघेही जयभवानी सोसायटी रूम नं.०५ सोसायटी नं.०५ पिंपरी पाडा मालाड ईस्ट मुंबई. मुळगाव मु. बामनवाडा पोस्ट-धामसिंग ता. राणीवाडा जि. जालोर राज्यस्थान), रफिउद्दीन उर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी वय- २८) व मोहम्मद फिरोज मो. अब्दुल (वय २१ रा. दोघेही पवारवस्ती, दापोडी पुणे मुळ रा. ग्राम बनियानी पोस्ट बनियानी तहसिल तांडा जि. आंबेडकरनगर उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यातील ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गुलाब डुंबरे, वय-४३, रा. फ्लॅट नंबर- ए१/ ९५०५, यशवीन इनकोर, टीप टॉप हॉटेल मागे, वाकड यांनी व्हर्लपूल कस्टमर केअर नावाने असलेल्या एका लिंक मधिल कॉल केल्यावर समोरुन बोलणा-या व्यक्तीने तो खरोखर व्हर्लपूल कस्टमर केअर मधुन बोलत असल्याचा बनाव केला. तसेच रफिक व फिरोज नावाचे दोन इसमांना पाठवुन त्यांनी सुद्धा ते व्हर्लपूल चे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून फिर्यादी कडुन गुगल पे द्वारा ३२५० रुपये घेऊन खोटे व बनावट इनव्हाईस देवुन फसवणूक केल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली होती.
दिलेल्या तक्रारीनुसार सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी माहितीच्या आधारे रफिउद्दीन उर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी व मोहम्मद फिरोज यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरील दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याचेकडे बनावट कस्टमर केअर बाबत माहीती मिळाल्यानंतर या बनावट कस्टमर केअर च्या व त्यांचे मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे झी 24 x 7 कस्टमर केअर सेंटरचा ठावठिकाणा शोधुन कस्टमर केअर सेंटरमध्ये अचानकपणे छापा टाकला.
यावेळी कस्टमर केअरचा मालक व तेथे काम करणारे ०४ मुली व ०२ पुरूष यांना ताब्यात घेतले. गुन्हा करणेसाठी वापरलेले ०७ मोबाईल, १७ छोटे मोबाईल व वेगवेगळया नोंद वहया, रजिस्टर व कॉम्पुटर असा १ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ०७ मोबाईल हे टोल फ्री क्रमांक असलेले मिळुन आलेले आहे. त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे अशोक माली, जयप्रकाश माली, पारस कुमार माली, यांना शुक्रवारी (ता. २९) अटक केली आहे. तर हयांच्यासोबत मिळुन आलेल्या तीन अल्पवयीन मुलींची चौकशी सुरू आहे.
व्हर्लपूल, सॅमसंग, गोदरेज, एल.जी इ. कंपन्यांचे नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर त्यांचे टोल फ्री क्रमांक (१) टोल फ्री क्रमांक १८००८४३३००८ (२) टोल फ्री क्रमांक १८००४१७८०८३ (३) टोल फ्री क्रमांक १८००४१९४८४७ (४) टोल फ्री क्रमांक १८००४१९८०८३ (५) टोल फ्री क्रमांक १८००४१५८६८३ (६) टोल फ्री क्रमांक १८००१०३८४४१ या टोल फ्री क्रमांकावरून वरील पाच आरोपींनी लोकांची फसवणुक केली आहे त्याबाबत अधिक तपास चालु आहे. फसवणुक झाली असल्यास तात्काळ हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधावा.
सदरची कामगिरी हिजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट- ४ मच्छिंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-४ अंबरीष देशमुख व महेंद्र गाढवे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार उमेश खाडे, सचिन सानप, युनिट-४ कडील पोलीस हवालदार प्रविण दळवी, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांनी केलेली आहे.