Hingoli News : हिंगोली : पोलीस दलातून दुख:द बातमी समोर आली आहे. हिंगोली – नांदेड मार्गावर माळेगाव पूलाच्या समोर चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री 10.10 वाजता घडला आहे. नागपूर शहर पोलीस दलात अपघातात मृत्यू झालेले पोलिस उपनिरीक्षक कार्यरत होते. या घटनेनंतर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
निळकंठ दंगडे असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर शिवाजी गायकवाड, गजानन राठोड जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक नीलकंठ दंडगे(वय44), शिवाजी गायकवाड, गजानन राठोड हे तिघे कामानिमित्त हिंगोलीहून आखाडा बाळापूरकडे कारने जात होते. (Hingoli News) दरम्यान, हिंगोली- नांदेड मार्गावर माळेगाव पुलाच्या समोर चालकाचा ताबा सूटल्याने कार उलटली. यात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार दिलीप पोले ,देविदास सूर्यवंशी, माधव भडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून पोलीस उपनिरीक्षक दंडगे यांना तपासून मृत घोषित केले. तर शिवाजी गायकवाड ,गजानन राठोड यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना हिंगोली व नांदेडकडे रवाना केले.
पोलिस उपनिरीक्षक निळकंठ दंगडे हे नागपूर शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दोनच वर्षांपुर्वी ते खात्यांतर्गत परीक्षा देवून ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते.(Hingoli News) ते मुळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाणचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Hingoli Accident : हिंगोलीत भीषण अपघात, पाच जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू…
जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत नवीन भरती जाहीर, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या…!