पुणे – मैत्रिणीच्या घरात घुसून चपलेने मारहाण करणाऱ्या २३ वर्षीय तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेनी पिंपरी पोलीस ठाण्यात समोवारी (ता. ३) फिर्याद दिली आहे. त्यानुसार २३ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आरोपी हे दोघे मित्र आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा मनात राग धरून आरोपी हा शुक्रवारी (ता. ३०) महिलेच्या घरात घुसला. आणि महिलेला चपलेने मारहाण केली. महिलेने आडवण्याचा प्रयत्न केल्याने, त्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.