पुणे : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक येथील गवळी वस्ती येथे १० मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याची घटना घडली होती. तसेच वाहनांची तोडफोड करण्यापूर्वी आरोपींनी दोन डिलेव्हरी बॉयला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पाच आरोपींना सोमाटणे फाटा येथून अटक केली आहे.
प्रेम सुरेश पाथरकर (वय १९ रा. बेबेढोहळ सोमाटणे फाटा, ता. मावळ), अमर उत्तम शिंदे (वय २३ वर्षे रा. परंदवडी ता. मावळ ), राज नाथा भोते (वय २१ वर्षे, रा. परंदवडी सोमाटणे फाटा, ता. मावळ), रोहित रामा खंडागळे (वय २१ वर्ष, रा. परंदवडी पाण्याच्या टाकी जवळ, ता. मावळ), संतोष तय्यप्पा जाधव (वय २० वर्षे, रा. परंदवडी ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नवे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी हे सोमाटणे फाटा येथे असल्याची माहीती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकत सर्व आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पाच जणांनी संगनमत करुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, मोबाईल तसेच चार धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे करत आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील आणि पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, उमेश गित्ते यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, प्रदीप क्षिरसागर, राजेंद्र करंजकर, वियज ढाकणे यांनी केली.