हडपसर : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४८ तासात चार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात हडपसर तपास पथकाला यश आले आहे. यामध्ये एक खून, एक दरोडा, २ जबरी चोऱ्या मधील एकूण ८ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाला लुटणाऱ्या तीन आरोपींना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांचायाक्डून पोलिसांनी एक दुचाकी, मोबाईल फोन व चोरलेली रोख रक्कम असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओमकार ऊर्फ खंडया राजु शिंदे (वय-२२ रा. वैदुवाडी हडपसर), व दोनविधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रकचालक राम सुदाम मोहाळे रा. खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २५) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी ट्रक चालकाला मारहाण करून १५ हजार रुपये पळवून नेल्याची घटना घडली होती. सदर घटनेचा तपास करीत असताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी भोसले व कुंभार यांना तिघेजण संशयितरीत्या एका दुचाकीवर जाताना दिसून आले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली वरील आरोपींनी दिली आहे.
दुसऱ्या घटनेत काळेपडळ येथून पायी जात असताना एका नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या तीन इसमांनी शनिवारी (ता. १७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धमकावून रोख रक्कम व मोबाईल चोरू नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणायत आला होता.
तपास करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार आणि प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीवरून सराईत गुन्हेगार ऋषीकेश पांचाळ याचा शोध घेवून त्यास बुधवारी (ता. २८) अटक करण्यात आली आहे. ऋषीकेश पांचाळ हा रेकॉर्डवरिल आरोपी असून त्याचे विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे मागील दोन वर्षांत हत्यार कायदा, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी असे ०५ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयात त्याचा साथीदार आकाश दिपक साटम वय २१ वर्षे रा. लेन. ४ काळेपडळ, हडपसर, यास अटक करुन गुन्हयातील शाईन दुचाकी व फिर्यादीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत मौज मजा करण्यासाठी हॉटेल चालकाच्या गळयाला कोयता लावुन डाव्या खादयावर कोयत्याने वार करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम २४ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार अमिर इब्राहीम तांबोळी (वय-२४, रा. ए. के. बिल्डींग, अल्फा पेट्रोल पंपासमोर, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती.
सीसीटीव्ही माहिती आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने कौशल्याने गुन्ह्यातील एकुण ७ आरोपी निष्पन्न केल्याने सदर दरोडयाच्या गुन्हयातील तीन आरोपी शुभम रमेश मोरे (वय- २२, रा. शिवनेरी कॉलनी नंबर ०२, पापडे वस्ती भेकराई नगर हडपसर), प्रसाद हनुमंत कांबळे (वय-२१ रा. घरोंदा सोसायटी, घर नंबर ३७५, फुलेनगर विश्रांतवाडी), हेमंत संदीप चौगुले (वय-२०, रा. चौगुले मळा, मातृछाया बिल्डींग, शिवरकर उद्यानजवळ वानवडी) यांना अटक करुन त्यांना ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. नमुद आरोपी यांनी त्यांचे फरारी साथीदार कौतुक क्षिरसागर, अंबर शेख, रोहन धोत्रे, धनेश शिंदे यांचेसह गुन्हा केला असल्याचे तपासामध्ये कबुल केले आहे.
चौथ्या घटनेत भंगार विक्रीतील पैसे वाटपावरून झालेल्या भांडणात एकाने बांबूने आणि दगडाने मारहाण करून मित्राचा खून करून ठार मारल्याची घटना घडली होती.
सागर गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा विठ्ठल रेखले (वय- २७, रा. कवडीगाव टोल नाका, लोणी काळभोर, ता. हवेली) असे खून करण्याऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २५) रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास डोक्यामध्ये गंभीर जखमा आणि रक्तस्त्राव होऊन बेशुध्द अवस्थेत नारळ बाग, केशव चौकाजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे येथे एक इसम पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी कृष्णा विठ्ठल रेखले वय २७ वर्ष रा. कवडी गाव टोल नाका, लोणीकाळभोर पुणे यास गुन्हा झालेपासून २ तासाचे आत ताब्यात घेतले. केलेल्या तपासात आरोपी कृष्णा रेखले याने भंगार विक्रीतील पैसे वाटपाच्या वादावरुन भांडणात सागर गायकवाड यास बांबूने आणि दगडाने मारहाण करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत व आरोपी दोघेही रिक्षा चालक आहेत. आरोपीने गुन्हयाची कबुली दिली.
दरम्यान, हडपसर पोलीसांनी मागील ४८ तासात ०१ खुन, ०१ दरोडा व ०२ जबरी चो-या असे ०४ गंभीर गुन्हे उघडकीस आणुन ०८ आरोपी अटक करुन गुन्हयातील वाहने, हत्यारे, मोबाईल व रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांनी केली आहे.