Hadapsar News : आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका प्रवासी महिलेला भलत्याच ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रिक्षाचालकाने हे कृत्य केले. दरम्यान, घाबरलेल्या महिलेने रिक्षातून उडी मारली, ‘जीपीएस’वरून पतीने पाठलाग केला. या वेळी रिक्षा उलटली आणि रिक्षाचालक फरार झाला होता. ही घटना रवी पार्क सोसायटी व ४८ सोसायटी यांच्या मधील रस्त्यावर मंगळवारी पहाटे ३.३० ते चार वाजण्यादरम्यान घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, चालकाला अटक करण्यात आली आहे.(Hadapsar News)
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रिक्षाचालकाने हे कृत्य केले.
या प्रकरणी पीडितेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अनिकेत मुंजाळ (वय २४, रा. फुरसुंगी) या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला फुरसुंगी येथील आयटी कंपनीत कामाला आहे.(Hadapsar News) रात्री साडेतीन वाजता काम सुटल्यानंतर महिलेने ‘उबर ॲप’वरून रिक्षा ‘बुक’ केली. महिला रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने ‘माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आहे, तुमच्या मोबाइलचे ॲप सुरू करा, जेवढे पैसे होतील तेवढे मला द्या,’ असे सांगून रिक्षा फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधून पुढे नेली.(Hadapsar News)
दरम्यान, रिक्षाचालक इच्छित ठिकाणी सोडण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जात असल्याचे महिलेच्या लक्षात आले. अनेकदा सांगूनदेखील चालक रिक्षा थांबवत नसल्याने महिलेने मित्राला व पतीला फोन करून सांगितले. अंधारात रेल्वे मार्गाशेजारी ‘लिटल फ्लॉवर स्कूल’शेजारी रिक्षा थांबली असता, रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. त्या वेळी महिलेने रिक्षाचालकाच्या हाताला चावा घेतला. चालकाने महिलेच्या पाया पडून ‘तुम्हाला घरी सोडतो, मला माफ करा,(Hadapsar News)’ असे म्हणून महिलेला पुन्हा रिक्षात बसवले आणि काळेपडळ रेल्वे फाटकापर्यंत नेले. काळेपडळचा ओळखीचा परिसर पाहून महिलेने रिक्षातून उडी मारली. तेवढ्यात पाठीमागून महिलेचे पती ‘जीपीएस’द्वारे पाठलाग करत आले. त्यांनी महिलेस कारमध्ये बसवून त्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, रस्त्यात रिक्षा उलटली.(Hadapsar News)
रिक्षा उलटल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन रिक्षाचालक पळून गेला. या दरम्यान रिक्षाचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिक झोपेतून जागे झाले. पोलिसांना महिलेच्या पतीने या प्रकाराची माहिती दिली होती. यावरून वानवडी पोलीस व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रिक्षातून उडी मारल्यामुळे महिला जखमी झाली होती. घटनेची माहिती घेऊन वानवडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वानवडी पोलिसांनी फरारी झालेल्या रिक्षाचालकाला अटक केली आहे.(Hadapsar News)