Hadapsar News : हडपसर, (पुणे) : पालखी सोहळ्यात वानवडी व हडपसर परिसरात चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. (Hadapsar News)
मिळालेल्या माहितीनुसार,
महंमदवाडी येथील महिला कुटुंबासह संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पुणे-सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकात गेली होती. पालखीचे दर्शन घेत असताना चोरट्याने साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार एस. के. कुंभार तपास करीत आहेत. (Hadapsar News)
हांडेवाडी येथील महिला पतीसह संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी हडपसर येथील गोंधळेनगर कमानीजवळ गेली होती. दर्शन घेत असताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार एस. टी. पांडुळे तपास करीत आहेत. (Hadapsar News)
हडपसर गाडीतळ येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी महेश माळी (वय २८, रा. वडगाव शेरी) याने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार सुजाता गायकवाड तपास करीत आहेत. (Hadapsar News)
दरम्यान, सांगली येथील महिला कुटुंबासह पालखीच्या दर्शनासाठी गेली असता तिच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या प्रकरणी महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात एक महिला आणि अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघींना पोलिसांनी पकडले आहे. पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे तपास करीत आहेत. (Hadapsar News)