Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : जेवण करून बाहेर पडलेल्या मित्रांवर धारदार शस्त्राने वार; दोघे गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 19:01

Hadapsar News हडपसर, ता. ९ : “तुम्ही इथे काय करता? इथे का थांबले आहात?” असा जाब विचारत तिघा अज्ञात तरुणांनी दोन मित्रांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात ७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात दोघांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले असून, जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Hadapsar News

याप्रकरणी राहुल आवळे (वय ३७, व्यवसाय – फॅब्रिकेशन व कन्स्ट्रक्शन व्यावसायिक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आवळे हे पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोड येथे कुटुंबासह राहतात. त्यांचे ‘आर्या फॅब्रिकेशन अँड कन्स्ट्रक्शन’ नावाचे दुकान असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. Hadapsar News

 

राहुल आवळे हे त्यांचा मित्र दिलीप सावंत याच्यासोबत अरुणनगर येथील सुरुची हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर दोघे हॉटेलबाहेर उभे असताना एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि “तुम्ही इथे काय करत आहात?” असा सवाल करू लागला. राहुल यांनी “तुला काय करायचे?” असे विचारताच त्या इसमाने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याचे आणखी दोन साथीदार तेथे आले. त्यापैकी एकाने “हा टकल्या तुला काही बोलला का?” असे म्हणत राहुल यांना उद्देशून शिवीगाळ सुरू केली. राहुल यांनी त्याला जाब विचारताच तिघेही अधिक आक्रमक झाले. Hadapsar News

“तुम्ही इथले दिसत नाहीत, थांबा तुम्हाला दाखवतो,” असे म्हणत आरोपींनी अचानक धारदार शस्त्र काढून राहुल आवळे यांच्या डोक्यावर आणि हातावर सपासप वार केले. मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या दिलीप सावंत यांच्यावरही आरोपींनी हातावर वार करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर दोघांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत राहुल आवळे आणि दिलीप सावंत यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. Hadapsar News

दरम्यान, राहुल आवळे यांनी “हल्ला करणारे आरोपी पुन्हा समोर आल्यास मी त्यांना ओळखू शकतो,” असे पोलिसांना सांगितले आहे. भररस्त्यात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे हडपसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हडपसर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Next Post

Rohit Pawar : विकास लवांडे शाईफेक प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांत अटक न झाल्यास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखणार - आमदार रोहित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.