Hadapsar News लोणी काळभोर : वाईन्स चालकाला हफ्ता मागणाऱ्या कथित दोन पत्रकारांना वाईन्स चालकाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना हडपसर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. (Hadapsar News) हडपसर व लोणी काळभोरसह परिसरात बोगस पत्रकारांच्या ब्लॅकमेलिंगमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. (Hadapsar News) तर लोणी काळभोर परिसरात बोगस पत्रकार मोकाट फिरत आहेत. (Hadapsar News)
मिळालेल्या माहितीनुसार, कथित दोन पत्रकारांनी हडपसर येथील एका वाईन्सच्या पडलेल्या रिकाम्या बाटल्याचे शूटिंग केले. आणि त्याची बातमी एका साप्ताहिक मध्ये छापली. त्यानंतर वाईन्सच्या मालकाने त्यांना कार्यालयात बोलावले अन समस्या काय आहे विचारले. दोन कथित पत्रकार तेथे गेल्यानंतर त्यातील म्होरक्या म्हणाला मला काहीतरी सुरु करा. तेव्हा वाईन्सचे मालक म्हणाले कि, कशाबद्दल पैसे द्यायचे आम्ही सरकारला महसूल भरतो अवैध काही करत नाही हे सुनावले.
त्यानंतर हा बोगस पत्रकार विनाकारण त्रास देत आहे. हे लक्षात आल्यावर वाईन्स चालकांच्या कामगारांनी दोघांना चांगला चोप दिला. यावेळी म्होरक्या पाळून गेला पण सोबतच्या वयस्कर साथीदारास मात्र चांगलाच प्रसाद मिळाला. मात्र याची हडपसर मध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे
दरम्यान, तोतया पत्रकार एका पक्षाचे नाव घेऊन पत्रकार असल्याच्या धमक्या देऊन व्यवसायिकांना नाहक त्रास देत आहे. या कथित पत्रकाराच्या विरोधात फिर्याद देण्यास कोणी पुढे येत माहित. त्यामुळे या कथित पत्रकाराने पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याने ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत सुरु आहे.
या कथित पत्रकाराने ज्यूस सेंटर, मोबाईल शॉपी, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, असे अनेकांना गंडवले आहे, त्यावर ११ गंभीर चोरी दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे बनावट आयडी कार्ड वापरून खंडणी मागितल्याचा गुन्हा काही महिन्यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
हडपसर व लोणी काळभोर परिसरात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट…
हडपसर व लोणी काळभोर परिसरात सध्या तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंद्यांची बातमी करतो, अशी धमकी देऊन पैसे उकळल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. कथित पत्रकार तक्रारदारास भेटून मिटवून घ्या असा मोलाचा सल्ला देतात. त्यामुळे या बोगस पत्रकारांनी उचछाद मांडला आहे. हे महाशय तक्रार देतात आणि मिटविण्यासाठी हजारो रुपये उकळतात असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. मात्र याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे.