पुणे : बारावीच्या सराव परीक्षेत मार्क कमी पडल्याने हडपसर येथील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या अमनोरा पार्क परिसरातील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने जीवन यात्रा संपवली.
अवंतिका कुलशेखर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आई वडील आणि लहान भाऊ असा तिचा परिवार आहे. शुक्रवारी तिचे पालक बाहेर गेल्याने घरी कोणी नसताना तिने सकाळी १० वाजता आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.